खेड्यातल्या कोणत्यातरी कोपऱ्यात बापडा"गरजवंत"दडलेला असतो आणि दूर शहरात कुठेतरी एखादा "दाता"असतो,ज्याचे 'दातृत्व"या दडलेल्या "याचका"पर्यंत पोहोचविण्यासाठी एक सक्षम आणि विश्वासू यंत्रणा कार्यान्वित असावी लागते. आणि आज आनंदाने म्हणावे लागेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी "भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान"च्या रूपाने अशी यंत्रणा "जिवंत"आहे.
पुणे येथील "सेवा सहयोग"ही संस्था दरवर्षी गरीब शालेय विद्यार्थ्यांना हजारो दप्तरांचे वाटप करते."भगीरथ"च्या माध्यमातून यावर्षी जिल्ह्यात सुमारे चारशे दप्तरांचे वितरण करण्यात आले.
आमच्या प्राथमिक शाळेसाठी हा सह"योग"जुळून आला तो "भगीरथ"च्या प्रसाद देवधर यांच्यामुळे .जिल्हा माहिती अधिकारी श्रीम.संध्या गरवारे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम संपन्न झाला.
आमच्या दृष्टीने तासभरात हा कार्यक्रम संपला पण दप्तर मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा देणारी ही "सामाजिक बांधिलकी" त्यांच्या चिमुकल्या पाठीवर पुढे कित्येक दिवस मिरवणार आहे.

No comments:
Post a Comment