बुधवारच्या सकाळी घरचा टेलिफोन वाजला की हल्ली माझी धड धड वाढायला सुरवात होते. तसा तो आजही वाजलाच… दोन खोल्यांच्या पलीकडे स्वयंपाक घरात काम करणाऱ्या आमच्या सौभाग्यवतीचे कान अर्थातच "या"फोनच्या रिंगकडेच असावेत,परिणामी काही सेकंदातच रिंगचा तो कर्कश आवाज दोन व्यक्तींच्या संभाषणात परावर्तीत झाला.आता इथे घडणाऱ्या संभाषणाचा संबंध थेट माझ्या आठवडाभराच्या रोजनिशीवर पडणार असल्याने माझे अस्वस्थ होणे क्रमप्राप्त होते.तब्बल अर्ध्या तासाने हे संभाषण "घरात खूप कामं पडलीत" या नोटवर संपलं.सौंच्या चेहऱ्यावर आजतरी कुठल्याही चिंतेची "गस्त" नव्हती. त्यामुळे पुढचा आठवडा विनावाद जाईल अशी शक्यता निर्माण झाली.
नेमकं काय घडतं दर बुधवारी?….
ज्योतिषशास्त्राच्या अतिरेकी नादाला लागलेली एक महिला दुर्दैवाने आमच्या सौंची जिवलग मैत्रीण आहे. ही बया दर बुधवारी सकाळी तरुण भारतची "खजाना" पुरवणी उघडते. त्यातले "ग्रह तुमचे अंदाज आमचा" हे सदर वाचते,नुसते वाचतच नाही तर बहुदा मुखोद्गत करते आणि त्यात लिहिल्याप्रमाणे आचरण ठेवणे किती मस्ट आहे, याची घरोघरी पारायणे करते. त्या "घरोघरी" आमचे घर क्रमांक एकवर आहे,याचा वेगळा उल्लेख करणे गरजेचे नसावे.
अर्थात या सदरातून बरीच धार्मिक माहिती शास्त्रोक्त स्वरुपात मिळत असल्याने आमचा कोणाचाच त्याला आक्षेप नाही, आक्षेप आहे तो त्याचा अतिरेक करण्याचा,परंतु त्यामध्ये सुचवल्याप्रमाणे विविध मंदिरांना(तेही अगदी नियोजित मुहूर्तावर) द्यायच्या भेटीगाठी,व्रतवैकल्ये,उपासतपास यासह खाण्या-पिण्यावरची बंधने आणि एकूणच त्याचा केला जाणारा गाजावाजा यामुळे आमची तर त्या आठवड्याची रोजनिशीच बहुतेक वेळा बदलून जाते.वर पुढचा बुधवार काय घेऊन येईल ते टेन्शन वेगळेच.
खरंतर वर्तमानपत्रातील राशीभविष्य वाचणे हा बहुतेक जणांचा असतो तसा माझाही छंद आहे. पण तो वाचण्यापुरताच मर्यादित आहे. कारण दिवसभरात पावलोपावली ठेचाळणाऱ्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला हे दोन ओळीतले आणि चार वाक्यांचे दिनमान कुठे म्हणून सावरणार ?…
पण अगदीच मजेने घ्यायचं म्हटलं तर याचा उपयोग सुद्धा करता येतो. समजा घरच्या मंडळींचा बाहेर जाण्याचा "मूड"असेल आणि राशीत "दुर्घटना व अपघाताची शक्यता" असे काहीतरी असेल तर ते वर्तमानपत्र "पुढे" करून आपल्याला बिनधास्त "मागे" सरता येते.त्यातूनही हे ग्रह सुद्धा कोणाच्या राशीत कधी कसे येतील याचा नेम नाही तसंच ते एकटे आले तर ठीक पण बऱ्याचदा "युती"करूनच येतात. आणि चुकून एखाद्याला भाग्योदय तर बऱ्याच जणांना शत्रुपिडा देऊनच येतात. (काही पक्षांच्या नेत्यांच्या राशीत मात्र या ग्रह"युती"वर गेली पंधरा वर्षे "आघाडी"मात करतेय हा भाग वेगळा )
दुसरं असं की,कधीतरी स्टेपनी नसलेली गाडी घेऊन आपण एकटे बाहेर जातो खिळा लागून गाडी पंक्चर होते आणि "अकारण मनस्ताप होईल" हे भाकीत तंतोतंत खरे करून देते. दुसऱ्या दिवशी मात्र "आज आवक बरी राहील" यात नक्कीची प्रिंटींग मिस्टेक होऊन "जा" चा "आ" झाल्याचा प्रत्यय येतो. राशीभविष्यातून आरोग्यासंबंधी नेहमी "नेत्र विकार संभवतात"किवां "सर्दीची पडशाची"वर्दी मिळते.रक्तदाब,मधुमेह अश्या प्रकारचे डीटेलिंग नसतंच परिणामी स्टोअर रूम मधली एखादी शिंक सुद्धा अचूक भाविष्यावणीचा दुजोरा देऊन जाते. "संततीकडून चांगली बातमी" (अर्थात निकालाची)कळायला ती हुशार तर असावीच लागतील. एखादा योग "वास्तुकर्ज कमी"करणारा असेल तर बहुदा तो त्या महिन्याचा ई एम आय गेल्यानंतरचाच असू शकतो."सामाजिक क्षेत्रात नावलौकिक" व "लिखाणाला प्रसिद्धी"हे हल्ली खंर होतंय ते फेसबुकवर स्वतःच टाकलेल्या पोस्टमुळे. सरते शेवटी "कष्टाने जे कमवाल त्याने सुख समाधान येईल" हे वाक्य मात्र प्रत्येकाच्या राशीत एकदम फिट बसते. त्यामुळे राशिभविष्य हे वाचण्यापुरते मर्यादित ठेवावे जगण्यासाठी नाही.

No comments:
Post a Comment