Friday, June 27, 2014

"इरादा पक्का …… वर्षातून एकदातरी कासारटक्का"……

"इरादा पक्का …… वर्षातून एकदातरी कासारटक्का"…… 



सिंधुदुर्ग जिल्ह्यातील "कासारटक्का" हे खरंतर एक "जागृत देवस्थान"म्हणावे असे ठिकाण आहे. कुडाळ मालवण रस्त्यावर चौके 

गावाच्यानजीकच्या एका ओढ्यावर हे छोटेसे मंदिर असून इथला "बैरागी कासारटक्का" हा नवसाला पावणारा आणि राखणीला धावणारा म्हणून 

प्रसिद्ध आहे.फारपुर्वी पासून जिल्ह्यातले व्यावसायिक प्रतिवर्षी शक्यतो पावसाळ्यात श्रावण महिन्याच्या अगोदर आपल्या मित्रमंडळीसोबत तिथे 

कोंबडा किवा बकऱ्याचा बळी देऊन सहभोजनाचा आनंद घेतात. काहीजण "रखवाली" म्हणून तर काहीजण "नवसफेड" म्हणून देवाला भक्ष्य अर्पण 

करतात. विशेष म्हणजे या देवस्थानाला मटणासोबत "दारू"सुद्धा वर्ज्य नसून तो देवाच्या नैवेद्याचा एक अविभाज्य घटक आहे.

काळानुरूप त्याची व्याप्ती वाढत असून या ठिकाणच्या जवळच असलेल्या "धामापूर" या पर्यटन ठीकाणापर्यंत या वनभोजनाच्या पंक्ती पाहायला 

मिळतात.

धामापूर तळ्याकाठचा निसर्गरम्य परिसर पर्यटन विभागाने विकसित केलेला असल्याने आता संपूर्ण वर्षभर इथे वनभोजनासाठी अनेक कुटुंबे 

आणि मित्रमंडळी यांच्या मोठमोठ्या ग्रुपची वर्दळ दिसून येते.यात अलीकडच्या काळात चाकरमानी मंडळींची संख्या लक्षणीय दिसून येते.सगळ्या 

लवाजम्यासह सकाळी या ठिकाणी जायचे. नवसाचा किवा राखणीचा कोंबडा नाहीतर बकरा देवापुढे मानवायाचा, मनातले नवससायास गाऱ्हाणे 

रूपाने देवापुढे सांगायचे,तळ्याकाठी मस्त जेवण बनवायचे, अर्थात पूर्ण मांसाहारी.मग गप्पा गोष्टी,चेष्टामस्करी यात रमत वनभोजनाचा आनंद 

लुटायचा आणि संध्याकाळी ताजेतवाने होत घरी परतायचे.असा इथला एकंदर दिनक्रम असतो. बुधवार,शुक्रवार आणि रविवार हे त्यासाठीचे खास 

दिवस.…

"नवस" वैगरे गोष्टी ज्याच्या त्याच्या मानण्यावर असल्यातरी वर्षातून एखाद्या दिवशी वनभोजनाचा आणि सहभोजनाचा आनंद घेण्यासाठी या 

निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्यायला हरकत नाही.…… 

No comments:

Post a Comment