Friday, June 27, 2014

"फोडणी"….

"फोडणी"…. 
आज आमच्या चिरंजीवांचा बारावीचा निकाल आहे.आमच्याच पावलावर पाऊल ठेवत स्थापत्य अभियांत्रिकीला प्रवेश घ्यायचा असे त्यांनी नक्की केले.आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काल घरात कॉलेज फी,हॉस्टेल खर्च,गरज पडल्यास डोनेशन या सर्वांचे ढोबळ अंदाजपत्रक अनुभवी लोकांच्या मदतीने तयार केले.अर्थात एकंदर आकडा आवाक्याबाहेरचा असल्याने, अनावश्यक खर्च टाळून दैनंदिन खर्चात कपात करण्याचे आवाहन आम्ही स्वतःच्या मनासह आमच्या सौ. ना अगदी आवर्जून केले.आश्चर्य म्हणजे त्यांनीही ते खूपच मनावर घेतले,आणि त्याचा प्रत्यय आज सकाळीसकाळी मला आला.
रोजच्या "पोळी-भाजी" नाश्त्याच्या ऐवजी आज चक्क डायनिंग टेबलवर रात्री उरलेल्या भाताला "फोडणी"दिलेली डिश होती.(अर्थातच कमीतकमी तेलात)….
आता कळत नाही "अच्छे दिन आयेंगे"…… की,"ऐसे दिन आयेंगे"……

No comments:

Post a Comment