"क्षण भाग्याचा"…….
आयुष्यात कधीकधी असे काही क्षण येतात की जे अनुभवल्यावर "भाग्य" काय असते ते समजते.माझ्याही आयुष्यात कालचा दिवस असाच भाग्याचा म्हणावा असा आला.त्याला निमित्त होते "श्री गुरुवेनमः" या तरुण भारतच्या सदराच्या समारोप सोहळ्याचे……
लाखो वाचकांनी पसंती दिलेल्या आणि गुरुशिष्य नात्याची वीण अधिक घट्ट करणाऱ्या "श्री गुरुवेनमः" या सदराच्या समारोप सोहळ्याच्या निमित्ताने आयोजकांनी हजारो गुरुशिष्याना एकाच छताखाली भेटण्याची आणि अविनाश धर्माधिकारी सरांसह अनेक मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी प्राप्त करून दिली.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील मान्यवर वक्त्यांबरोबर माझ्या सारख्या एका सामान्य वाचकालासुद्धा आपले मनोगत मांडण्याची संधी मिळाली.ज्यांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक व्हावे असे श्री धर्माधिकारी सर, तरुण भारत परिवाराचे मामा ठाकूर,जडणघडणचे संपादक श्री सागर देशपांडे,खामकर सर,प्रमोदजी जठार आणि समोर उच्चविद्याविभूषित,अनुभवसंपन्न असा हजारोंचा जनसमुदाय यांच्यासमोर मनोगत व्यक्त करण्याचे धाडस आणि योग या सदराचे संयोजक आणि आवृत्तीप्रमुख श्री विजय शेट्टी यांच्यामुळेच प्राप्त झाला,आणि एका सुंदर हृदयस्पर्शी सोहळ्याचा साक्षीदार/भागीदार होता आले.जीवनात असे भाग्याचे क्षण मिळवून दिल्याबद्दल संपूर्ण तरुण भारत परिवाराला धन्यवाद आणि अनेक शुभेच्छाही……

No comments:
Post a Comment