Tuesday, March 4, 2014

"एक दुजे के लिये"…

"एक दुजे के लिये"…
"पती-पत्नी" या नात्याला आपल्याकडे अनन्यसाधारण असे महत्व आहे. एकंदर नातेसंबंधांचा विचार करता हे नाते खूप "विचार"करायला लावणारे आहे.
तसा लग्नानंतरच्या प्रत्येक क्षणाक्षणाला या नात्याचा "कस"लागत असतो आणि त्यातूनच हे नाते"दृढ"होत जाते,पण या नात्याची खरी ताकद लक्षात येते आणि हे नाते अधिक घट्ट होते ती दोघांपैकी एकजण आजारी असताना असे अनुभवातून मला वाटते.
दोघांमध्ये जेव्हा एक "स्लीपिंग पार्टनर"(आजारी)असतो तेव्हा साहजिकच दुसऱ्याची जबाबदारी सेवासुश्रुषा करण्याची आणि त्याला मानसिक आधार देण्याची असते,या दरम्यान कुणाकडूनही कोणत्याही स्वार्थाची भावना नसते.अश्यावेळी कुठल्याही कारणावरून कुणाचा अहंकार दुखावला जात नाही कारण आजारी व्यक्तीला आपल्यामुळे समोरच्याला त्रास होत असल्याची अपराधी भावना असते,आणि समोरच्याला हा आपला धर्मच आहे याची जाणीव असते.कधी नव्हे तितका वेळ एकमेकांसाठी दिल्याने कुटुंबासहित बऱ्याच विषयांवर एकमेकाची मते जाणून/समजून घेता येतात,आणि आपसूकच त्यांचा आदर केला जातो.
खूप विषयांवर चर्चा झाल्याने एकमेकाला आपला पार्टनर एका वेगळ्या नजरेतून पूर्णपणे उमजतो आणि जसा असेल तसा तो परिपूर्ण वाटतो.आणि त्रासाचा असलेला हा काळही सुखाचा वाटतो.

No comments:

Post a Comment