"तो राजहंस एक"…….
"जरा कापी तो देखो इसकी,बिलकुल उसीकी सुरत जैसी है … धत…. गधा कही का"
असं म्हणत हिंदीच्या सिंग सरांनी अख्ख्या वर्गासमोर त्याची वही भिरकावली.एका वाक्यातच सरांनी त्याचा अजागळपणा आणि हिंदी विषयातल्या चुका या दोन्ही बाबींचा उद्धार केला होता, त्यामुळे वर्गातील मुलांचे हसणे स्वाभाविकच होते,आणि बालसुलभ वृत्तीने सर्वांनी ते पार पाडले.तो मात्र पुरता खजील झाला.गेल्याच आठवड्यात इंग्रजीच्या चौधरी बाईनी सुद्धा यापेक्षा थोडा कमी असेल पण असाच प्रकार केला होता.गेल्या महिन्या दोन महिन्यात. वर्गातल्या मुलांना आणि शेजारीपाजारी लोकांना टिंगल टवाळीला तोच एक हक्काचं गिऱ्हाईक होता,
इथे चूक लोकांचीही नव्हती अन त्याचीही.…… चूक होतो प्राप्त परिस्थितीची…
मालवणी मुलखातल्या एका खेडेगावातून सातवी पर्यंतचे शिक्षण घेऊन तो मुंबईत आला होता आपल्या काकांकडे.खरतरं गावातल्या शाळेतला तो हुशार विद्यार्थी होता.पण मुंबईनगरीत आल्यावर मात्र त्याला बुजल्यासारखे झाले होते.हिंदी मराठी या दोन्ही भाषा मालवणी अंगाने बोलण्याची त्याची सवय सगळीकडे चेष्टेचा विषय ठरत होती.इथल्या मुलांच्या तुलनेत आपल्याकडे काहीतरी कमी असल्याच्या भावनेने त्याचा पूर्वीचा आत्मविश्वास आणि हुशारी कुठल्या कुठे गायब झाली होती.आणि इतक्या लहान वयात परक्यांकडे राहून या सगळ्या परिस्थितीशी जमवून घेणे त्याला फार अवघड जात होते.काकांची परिस्थिती सुद्धा यथातथाच होती त्यामुळे त्याचे वास्तव्य तसे चाळ कम झोपडपट्टी परिसरातच होते.
त्याचे काका त्यादरम्यान दत्ता सामंतांचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्या ओळखीने याला आठवीसाठी प्रवेश मात्र चांगल्या शाळेत मिळाला होता.पण हीच चांगली शाळा आता त्याला सोडून द्यावीशी वाटत होती.कारण याच शाळेच्या टाय बुटातल्या युनिफॉर्ममध्ये त्याला फारच घुसमटल्यासारखे वाटत होते.दोन महिने झाले तरी वर्गातल्या मुलांमध्ये त्याला मिसळता आले नव्हते.
"एका तळ्यात होती"…… हे गाणे त्याला त्यावेळी माहित नसावे,पण अवस्था मात्र नक्कीच तशीच झाली होती.त्यादिवशीच्या प्रकाराने त्याने शाळा सोडून परत गावाकडे जायचे ठरवले पण सांगणार कोणाला आणि ऐकणार कोण? असा प्रश्न होताच ……
दोन चार दिवस असेच अस्वस्थतेत गेले. बालबुद्धीने सगळ्या शक्यतांवर विचार करून पहिला पण दहावीपर्यंत या इथेच शिकावे लागेल या पलीकडचा पर्याय काही सापडला नाही.
एक एक दिवस पुढे सरकत होता. आपण नक्की कुठे कमी पडतो यावर विचार सुरु झाला.आपण हुशार तर आहोतच फक्त आपले चालणे बोलणे आणि स्वतःहून इतरात मिसळणे याकडे लक्ष द्यायची गरज होती. हळूहळू तेही जमायला लागले.आता अख्ख्या वर्गातील मुलांपेक्षा आपल्यात काहीतरी न्यून आहे हा त्याच्या मनातला विचार बाजूला सरू लागला.
म्हणता म्हणता सहामाई परीक्षा सुरु झाल्या आणि संपल्या सुद्धा…मुंबईतली पहिली दिवाळी सुद्धा त्याने मनसोक्त एन्जॉय केली.चाळीतल्या वार्षिक सत्यनारायण महापूजेच्या कार्यक्रमात थोडेफार निवेदन सुद्धा केले.आता एक होतकरू मुलगा म्हणून चाळीतल्या लोकांचे प्रेम त्याला मिळू लागले.
एव्हाना शाळा सुरु झाल्या आणि निकालाचा दिवस उजाडला. हातात मिळालेल्या मार्कशीटवर आज त्याचाही विश्वास बसत नव्हता की, वर्गातल्या पंचावन्न मुलांमध्ये आपण तिसऱ्या क्रमांकाने पास झालो.
त्यादिवशी जवळपास सर्वच विषयाच्या शिक्षकांनी त्याचे कौतुक केले.घरी काका-काकूलाही आनंद झाला.निकालाने बरीच किमया झाली होती. आता वर्गातल्या सर्वच विद्यार्थ्यानी त्याच्याशी मैत्री करायला सुरवात केली.आणि शिक्षकमंडळी सुद्धा विशेष लक्ष देऊ लागली. पुढे त्याचा क्रमांक तीनच्या खाली कधी आला नाहीच तर बोर्डाच्या दहावी परीक्षेत पहिला झाला.
मात्र हे सर्व घडण्यासाठी त्याचेच त्याला कळावे लागले की "……तो राजहंस एक"…….

No comments:
Post a Comment