निवडणुकांचा सिझन सुरु झाला की पक्षकार्यकर्त्यांचे अनेक रंगीबेरंगी किस्से ऐकायला मिळतात,आणि त्याने मनोरंजनही खूप होतं.काही वर्षांपूर्वी आमच्या सौ.निवडणुकीला उभ्या होत्या.आमची ती पहिलीच निवडणूक होती.
आमच्या गावातच प्रचार कार्यालय आणि त्याच्या बाजुलाच जेवणावळीचा मंडप उभारला होता.तिथे रोज रात्री मांसाहाराच्या पंगती उठायच्या.विशेष म्हणजे रोजची जेवणासाठीची उपस्थिती ही दिवसभर प्रचारासाठी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चौपट असायची.मग आमचे प्रचारप्रमुख वाडीवाडीतल्या प्रमुख कार्यकर्त्याकडून रिपोर्टिंग घ्यायचे ते मात्र फार रंजक असायचे.
ही वाडी "प्याक" ती वाडी "प्याक"…… अमक्याला "म्यानेज" केला तमक्याला "फोडला" आणि बरंच काही…… त्यांच्या सांगण्यावरून मिळणाऱ्या मताची बेरीज केली तर बहुतेक वेळा ती एकूण मतदारसंख्येच्या बाहेर जायची. (मग मनात यायचे की,साला हे आपल्या विरोधी लढणारे उमेदवार घरी बसून ***** कि काय?
असंच एका कार्यकर्त्याला त्याच्या वाडीत मिटिंग लावायला सांगितली.वाडी छोटी होती त्यामुळे साधारण तिसेक माणसे अपेक्षित होती.संध्याकाळी वेळेपेक्षा थोडे उशिराच आम्ही पोहोचलो. आणि पाहतो तर खळ्यात नुसती ताडपत्री आणि दोन पाण्याने भरलेले तांबे आणि पडवीतल्या कॉटवर घोरत पडलेले एक जख्ख म्हातारे गृहस्थ असाच काहीसा "सेट" होता.
पुढे पहिली घंटा …. दुसरी घंटा झाली तरी त्याच्या घरातली माणसे सुद्धा खळ्यात उतरली नाहीत,
इतकं असूनही तो मुरब्बी कार्यकर्ता काही ना काही थापा जोडताच होता.सरते शेवटी आम्ही निघताना तो म्हणाला
"काय काळजी करू नका,माझी तीस मता "जाग्यार"आसत,सगळी एकटाकी तुमकाच पडतली"
तेवढ्यात आमच्यातला एकजण त्या कॉटकडे हात दाखवत वैतागून म्हणाला
"बाकी काय असला तरी तुझा ह्या याक मत मात्र खरोखरच "जाग्यार"हा, नक्कीच ता निवडणुकीच्या आधीच मतदार यादीतसून बाहेर पडतला"