"धनी"…….
(तीस पस्तीस वर्षे संसार केल्यावर एका खेड्यातल्या सामान्य शेतकऱ्याला वाटते की,हे कष्टप्रद जीवन जगताना,जिने आपली साथ दिली त्या आपल्या अर्धांगिनीवर आपल्याकडून "प्रेम" करायचचं राहून गेलं,तो तशी कबुली देतो,तेव्हा त्याची सहचारिणी कवितेतून अशी व्यक्त होते)
असं कसं म्हणू धनी,
तुम्ही प्रेम नाही केलात……
लग्नानंतर फिरायला म्हणून,
गावच्या माळावर घेऊन गेलात…
काट्याकुट्यात फिरून तुम्ही,
मला "करवंद" आणून दिलात …//१//
पहिली मुलगी झाली तेव्हा,
तुम्हीं नाराज नाही झालात,
माय लेकीला भेटायला तुम्ही,
सहा मैल चालून आलात… //२//
घरच्यांच्या जाचात कधी,
माझी बाजू नाही घेतलात….
पण "हेही दिवस जातील"
असा प्रेमाने धीर दिलात…//३//
दोन मुलींवर थांबण्याच्या निर्णयाला,
मनापासून अनुमोदन दिलात…
रुसल्या फुगल्या घरच्यांची,
प्रेमाने समजूत काढलात…. //४//
आजारपणात माझ्या तुम्ही,
अख्खी रात्र रात्र जागलात……
वेणी फणी करून मुलींची,
त्यांचे कपडे सुद्धा पिळलात…//५//
शेताभाताच्या कामात नेहमी,
मला झुकतं माप दिलात….
स्वतः मात्र उभं आयुष्य,
घाण्याला जुंपून घेतलात…//६//
गेल्या वर्षी हट्टाने माझी,
'साठी' साजरी केलात……
फोटोसाठी का होईना मला,
हळूच मिठीत घेतलात…//७//
जिथे संधी मिळाली तिथे,
तुम्ही माझाच विचार केलात….
असं कसं म्हणू धनी,
तुम्ही प्रेम नाही केलात…//८//
—(तीस पस्तीस वर्षे संसार केल्यावर एका खेड्यातल्या सामान्य शेतकऱ्याला वाटते की,हे कष्टप्रद जीवन जगताना,जिने आपली साथ दिली त्या आपल्या अर्धांगिनीवर आपल्याकडून "प्रेम" करायचचं राहून गेलं,तो तशी कबुली देतो,तेव्हा त्याची सहचारिणी कवितेतून अशी व्यक्त होते)
असं कसं म्हणू धनी,
तुम्ही प्रेम नाही केलात……
लग्नानंतर फिरायला म्हणून,
गावच्या माळावर घेऊन गेलात…
काट्याकुट्यात फिरून तुम्ही,
मला "करवंद" आणून दिलात …//१//
पहिली मुलगी झाली तेव्हा,
तुम्हीं नाराज नाही झालात,
माय लेकीला भेटायला तुम्ही,
सहा मैल चालून आलात… //२//
घरच्यांच्या जाचात कधी,
माझी बाजू नाही घेतलात….
पण "हेही दिवस जातील"
असा प्रेमाने धीर दिलात…//३//
दोन मुलींवर थांबण्याच्या निर्णयाला,
मनापासून अनुमोदन दिलात…
रुसल्या फुगल्या घरच्यांची,
प्रेमाने समजूत काढलात…. //४//
आजारपणात माझ्या तुम्ही,
अख्खी रात्र रात्र जागलात……
वेणी फणी करून मुलींची,
त्यांचे कपडे सुद्धा पिळलात…//५//
शेताभाताच्या कामात नेहमी,
मला झुकतं माप दिलात….
स्वतः मात्र उभं आयुष्य,
घाण्याला जुंपून घेतलात…//६//
गेल्या वर्षी हट्टाने माझी,
'साठी' साजरी केलात……
फोटोसाठी का होईना मला,
हळूच मिठीत घेतलात…//७//
जिथे संधी मिळाली तिथे,
तुम्ही माझाच विचार केलात….
असं कसं म्हणू धनी,
तुम्ही प्रेम नाही केलात…//८//
No comments:
Post a Comment