"तफावत"......
आपल्या समाजात अजूनही स्त्रीचे स्थान दुय्यम असल्याचा (म्हणजे ठेवल्याचा)प्रत्यय वारंवार येत असतो.खासकरून खाजगी मजुरीच्या बाबतीत स्त्री कामगाराची मजुरी ही जवळपास पुरुष कामगाराच्या निम्म्याने असल्याचे निदर्शनास येते. यासाठी सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न करूनही ती तफावत भरून काढता आलेली नाही.मला वाटत होते की हा दुजाभाव फक्त मनुष्य जातीतच असेल पण तो प्राणी मात्रातही आढळतो. आज गावठी कोंबडी आणण्यासाठी मार्केट मध्ये गेलो तर तिथे "गावठी कोंबडा" दोनशे वीस रुपये किलोने तर बिचारी "गावठी कोंबडी"त्यापेक्षा कमी म्हणजे दोनशे रुपये किलोने कापली जात होती.भाजी प्रकारात मात्र समाधानकारक बदल दिसला तिथे "ती"मेथी महाग आणि त्याच्या तुलनेत"तो" मुळा फारच स्वस्त होता…………

No comments:
Post a Comment