"आमचो ब्यारीस्टर"
अणाव गावी आमच्या "सावंत भोसले"घराण्याच्या सात-आठ पिढ्या झाल्या,परंतु आमच्या घराण्यात अजून "वकील"नव्हता. राजघराणे असूनही आम्ही "भानगडी" नाही. जमीन जुमल्यात थोडीफार दिवानगी आहे पण "दिवाणी" एवढी नाही, हौसेपुरती मारामारी आहे पण "फौजदारी" एवढी नाही,या कारणे बहुदा आमच्यापैकी कोणाला वकिली हे प्रोफेशन भावलं नव्हतं,पण परवाच एल एल बी चा निकाल जाहीर झाला आणि आमचे बंधू "मंगेशराव" हे वकिली पास झाल्याने फार आनंद झाला. मुळात ते सरकारी नोकरीत आहेत परिणामी तूर्तास "काळा कोट" घालणार नाहीत, तरीही पुढेमागे पक्षकाराना "काय-द्याचं" ते सांगण्यासाठी कोर्टात जातील आणि एक यशस्वी वकील म्हणून नाव वैगरे "कमावतील" यात शंका नाही. तोपर्यंत आमच्या डोक्यावर चुकून काही "केसेस"असतील तर त्याही लढतील. यासाठी त्यांना अनेक शुभेच्छा…. !
(वरील संदर्भाने आमच्या घराण्यात अजून कोणी डॉक्टर नाही याचा अर्थ सर्वजण "ठणठणित" आहेत असा काढू नये )

No comments:
Post a Comment