"दुनियादारी"……
जोपर्यंत दोस्ती-यारी,दुष्मनी,
आनंद-दु:ख, प्रेम-मत्सर……
या भावना मानवी मनात अनंत आहेत,
जोपर्यंत दोन पिढ्यांमध्ये मानसिक अंतर आहे,
तोपर्यंत हि काल्पनिक,परंतु प्रातिनिधिक असलेली सत्यकथा अमर आहे ……
तत्कालीन आर्थिक परिस्थितीच्या मर्यादांमुळे मी दहावी नंतर डिप्लोमाला प्रवेश घेतला. त्यामुळे इच्छा असूनही "कॉलेज लाइफ"ची खरंतर मजा लुटता आली नाही. परंतु त्याच दरम्यान सुहास शिरवळकराची "दुनियादारी"हि कादंबरी हाती पडली आणि त्यातल्या हव्या त्या व्यक्तिरेखेत शिरून खऱ्या अर्थाने दुनियादारी शिकता आली.१९८२ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीने माझ्याप्रमाणेच कैक जणांना दुनियादारी ची मजा दिली.आजच्या युगात"मशीन"बनलेल्या सर्वच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ही दुनियादारी शिकण्याची, अनुभवण्याची खरच गरज आहे. आणि हीच गरज ओळखून प्रयोगशील दिग्दर्शक संजय जाधव यांनी याच कादंबरीवर याच नावाचा सिनेमा तयार केला आहे, जो लवकरच प्रदर्शित होतोय. ज्यांनी हि कादंबरी वाचली आहे त्यांना पुनर्प्रत्ययाचा आनंद नक्की मिळेल आणि नविनाना "दुनियादारी"चे फंडे मिळतील.
आम्हीही उद्यापासून निघालोय "दुनियादारीला"…. आठ दिवसांनी पुन्हा भेटूच,तोपर्यंत गुड बाय ….